Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

सदाशिव पेठेत ओैषध दुकानातून पावणेतीन लाखांची रोकड चोरी

इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी

चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील सदाशिव पेठेत ओैषध वितरकाच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ८२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ओैषध वितरकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक गाय वाचली तर एक आत्महत्या थांबेल-अभिनेता प्रवीण तरडे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरासमोर तक्रारदार ओैषध वितरकाचे दुकान आहे. गुरुवारी (१९ मार्च) सायंकाळी दुकान बंद करण्यात आले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील दोन लाख ८२ हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यात आले. तेव्हा रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×