Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

फटाके वाजवताना वाद; तरुणावर शस्त्राने वार

मोटार चालकाकडून पीएमपी चालकाला मारहाण

कोरेगाव पार्क भागातील घटना

marathinews24.com

पुणे – फटाके वाजविताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.ओंकार बसूराज कोळी (वय २६), शुभम बसूराज कोळी (वय २६, दोघे रा. दरवडे मळा, कोरेगाव पार्क ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २० लाखांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) तक्रारदार तरुण आणि मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी ओंकार आणि त्याचा भाऊ शुभम घरासमोर फटाके वाजवत होते. फटाके वाजवण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपी कोेळी यांंनी तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक हंडाळ तपास करत आहेत.

वैमनस्यातून तरुणावर वार

वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. प्रेम विकी ससाणे (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास यशवंतनगर भागात थांबला होता. त्यावेळी वैमनस्यातून आरोपी ससाणे आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस कर्मचारी कायगुडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×