Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २० लाखांचा ऐवज लंपास

नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेत मांडलेले दागिने, रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा वाडेबोल्हाई-राहू रस्त्यावर बंगला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी पूजा मांडली होती. प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी पूजेतील ऐवज पुन्हा कपाटात ठेवण्यत येणार आहे. चोरट्यांनी मध्यरात्री स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. देवघरात मांडलेल्या पूजेतील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले.

पाडव्याच्या दिवशी (२२ ऑक्टोबर) सकाळी देवघरातील पूजेत मांडलेले दागिने आणि राेकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी व्यावसायिकाच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×