Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

तब्बल ११ लाख ४५ हजारांची रक्कम केली परत

marathinews24.com

पुणे – जाहिरातीच्या माध्यमातून तरुणाची तब्बल ११ लाख ४५ हजारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून रक्कम परत मिळवून दिली आहे. हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यु ओमनगर, हुडकेश्वर, नागपूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

कोंढव्यात टोळक्याची दहशत; दुकानाची तोडफोड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाला सकाळ टुडे” वृत्तपत्रात आलेल्या “वर पाहिजे” जाहिरातीमधून महिलेचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधताच संबंधित महिलेने आकांक्षा पाटील असे नाव सांगितले. तिने फिर्यादींना दुसऱ्या क्रमांकावर “ममता जोशी” नावाच्या महिलेचा संपर्क क्रमांक दिला. त्यानंतर फिर्यादी आणि ममता जोशी यांच्यात फोनवर सतत संपर्क झाला. दोन्ही महिलांनी तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एकीने मावसभाची आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे तरुणाला सांगितले. त्यानंतर अपघात झाल्याचे सांगून रक्कम मागवली. त्यानुसार तक्रारदाराने तिच्या सांगण्यावरून १८ एप्रिल ते १ जून २०२५ दरम्यान वारंवार यूपीआय आयडीवर ११ लाख ४५ हजार रुपये ऑनलाइनरित्या पाठवले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी महिला हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यु ओमनगर, हुडकेश्वर, नागपूर) या महिलेला पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांच्या चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

पोलिसांनी १५ ऑक्टोबरला चार्जशीटसह न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला जामिन मंजूर केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्यासह अंमलदार संतोष जाधव, विशाल जाधव, मेघा गायकवाड आणि प्रतिक करंजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×