Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कोंढव्यात टोळक्याची दहशत; दुकानाची तोडफोड

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरीला - अमेरिकन डॉलर, सोन्याची अंगठी लंपास

कोंढवा पोलिसांनी तिघांना केली अटक

marathinews24.com

पुणे – टोळक्याने दहशत माजवून दुकानाची तोडफोड केल्याची घटना कोंढव्यात घडली. तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. हामजा खान (वय २०), फिदा खान (वय २०), शाहरूख शेख (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर मोहम्मद युसुफ शेख (वय ४७, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार डेअरी कर्मचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख यांचे मीठानगर भागात दुकान आहे. आरोपी खान, शेख आणि साथीदार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मीठानगर परिसरात आले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविली. परिसरातील दुकानांच्या दरवाज्यावर लाथा मारल्या, तसेच एका चिकन विक्री दुकानाचा एलईडी फलक फोडला. एका भंगार माल दुकानाच्या बाहेर ठेवलेला दूरचित्रवाहिनी संच फोडला. आरोपींनी दहशत माजविल्यामुळे नागरिक घाबरले. दुकानदारांन त्यांची दुकाने बंद केली. पसार झालेल्या आराेपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.

बोपोडी तरुणाचा खुनाचा प्रयत्न

बोपोडी भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. दीपक जगदीश कोरी (वय २०, भाऊ पाटील चाळ, बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रोहित अमर उबाळे (वय २५, रा. नटराज चौक, बोपोडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत उबाळे याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उबाळे याची बहीण आणि आरोपीच्या नात्यातील एक तरुणी मैत्रिणी आहेत. आरोपीच्या नात्यातील तरुणीशी एका तरुणाशी प्रेमसंबध होते. याबाबतची माहिती उबाळे याच्या बहिणीला होती. प्रेमसंबंधांची कुणकुण लागल्याने आरोपी कोरी चिडला होता. २० ऑक्टोबर रोजी तो आणि दोन साथीदार उबाळेच्या घरी गेले. आरोपींनी उबाळेच्या बहिणाीला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी उबाळेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेला आरोपी कोरी याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्वजय चौगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×