Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार डेअरी कर्मचाऱ्याचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मोटार चालकासह चौघे अटकेत

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार डेअरी कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी मोटार चालकासह चौघांना पोलिसांनी अटक केली. सनी अंबादास मिसाळ (वय २७, रा. ललकार मित्र मंडळाजवळ, ताडीवाला रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. मोटार चालक अमान समीर मणियार (वय २१, रा. हांडेवाडी), अरेझा निझाद इंजिनिअर (वय २१, रा. उंड्री), पार्थ राकेश पांडे (वय २३, रा. रावेत, पिंपरी-चिंचवड), तरुण महेश निहलानी (वय २६, रा. उंड्री) यांना अटक करण्यात आली. याबाबत मिसाळ याच्या भावाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धानोरीत महिलेचा खून करणारा गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसाळ हा एका खासगी दूध डेअरीत पर्यवेक्षक आहे. २१ ऑक्टोबर रोजी डेअरीतील एका कर्मचाऱ्याने सुट्टी घेतली होती. त्यामुळे मिसाळ हा सकाळी साडेसहाच्या सुमारास महंमदवाडी परिसरातून कामावर निघाला होता. रहेजा व्हिस्ट सोसायटीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार मिसाळला धडक दिली. अपघातात मिसाळ गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या मिसाळ याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकासह चौघांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×