परिमंडळ दोनधील ८ सराईत गुन्हेगार तडीपार
marathinews24.com
पुणे – Pune Police Action Against Criminals : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून परिमंडळ दोन मधील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीत एकाच वेळी चौघांवर कारवाई झाली आहे. संकेत गोरख चोरगे (वय २४), आकाश उर्फ बंटी विलास पवार (वय २६), वैभव युवराज डोळसे (वय २३), सौरभ राजेश साठे (वय २०), नितीन ज्ञानोबा लगाडे (वय २२), विष्णू लक्ष्मण होसमणी (वय २१) , अमान शाकीर शेख (वय २०) सचिन उर्फ आश्रय सौदागर खडे (वय २२) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत.
सुकामेवा, नुडल्सच्या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी – सविस्तर बातमी
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील चार पर्वती पोलीस ठाण्यातील दोन आणि आंबेगाव पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण आठ जणांना तडीपार करण्यात आले आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश आहे. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आंबेगाव, भारती विद्यापीठ, पर्वती, विवेकानंद, स्वारगेट, मार्केट यार्ड आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांचा या कारवाईत समावेश आहे.
संबंधित गुन्हेगारांकडून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगलाच इशारा मिळाला असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ४० गुन्हेगार तडीपार
Pune Police Action Against Criminals परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कायदा सुव्यवस्थेला बाजार ठरणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारी एम पी डी ए तसेच मकोका सारखी कडक कारवाई केली आहे.
पोलीस ठाणे निहाय कारवाई
– आंबेगाव – ११
– भारती विद्यापीठ– १३
– पर्वती – ०४
– विवेकानंद – ०१
– स्वारगेट – ०५
– मार्केट यार्ड – ०४
– सहकारनगर – ०२
एकूण-४० गुन्हेगार तडीपार






















