Breking News
Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडाSkill Development for Youth : कौशल्यसंपन्न युवा पिढी घडविणे हीच विकसित देशाची खरी गुरुकिल्ली- डॉ. विजय भटकरMaharashtra Fodder Shortage : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जPune Police Action Against Criminals : पुणे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाईAkshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपास

Pune House Burglary News

अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – Pune House Burglary News : ऐन दिवाळीत शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, कोरेगाव पार्क, कात्रज आणि वाघोली परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरांचे कुलूप तोडून ऐवज लंपास केला. या घटनांमध्ये सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोकड चोरीला गेली आहे. तिन्ही प्रकरणांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

कोरेगाव पार्कमधील ओंकार हाइट्स येथील सी-७ सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत ५८ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चार नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सात या कालावधीत ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॉक कशाच्या तरी साह्याने तोडून घरातील दागिने लंपास केले.

कात्रज येथील बाबाजी महाराज जैन संघ मंदिरात घडली. मंदिरातील दानपेटी तसेच गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साह्याने तोडून चोरट्यांनी एक लाख ७५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि ७५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. (Pune House Burglary News) याबाबत ६३ वर्षीय व्यक्तीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा या कालावधीत हा प्रकार घडला.

वाघोलीतील महाराष्ट्र गाडी दुकानामागील दशरथ कट्टे यांच्या घरी घडली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र, चार हजार रुपयांचे चांदीचे दागिने, ४० हजार रुपयांची रोकड आणि चार हजार रुपयांच्या सहावारी साड्या असा एकूण ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चार नोव्हेंबर रोजी दुपारी एक ते साडेतीन या वेळेत ही घरफोडी झाली. तिन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×