Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

धानोरीत महिलेचा खून करणारा गजाआड

एमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्या

विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने २४ तासात खून प्रकरणाचा लावला छडा 

marathinews24.com

पुणे – शहरातील धानोरी परिसरात महिलेचा खून करुन पसार झालेल्या बांधकाम मजुराला पोलिसांनी अटक केली. गृहप्रकल्पाजवळ महिलेचा मृतदेह सापडला होता. विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने २४ तासात खून प्रकरणाचा छडा लावला.

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

गीता विक्रम रेड्डी (वय ४५, रा. टिंगरे चाळ, धानोरी गावठाण ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रामध्यान महाबल चौहान (वय ३१, सध्या रा. पत्र्याची खोली, पाण्याच्या टाकीजवळ, बी. यू. भंडारी ग्रीन सोसायटी, धानाेरी, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता रेड्डी ही देहविक्रय करते. २० ऑक्टोबर रोजी चौहान हा रेड्डीला भेटला. त्यांच्यात पैशांवरुन वाद झाले. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन खून केला. तिचा मृतदेह बी. यू. भंडारी सोसायटीजवळ मोकळ्या जागेत साचलेल्या कचऱ्यात फेकून दिला. दरम्यान, कचऱ्यात एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. चौकशीत रेड्डी पुणे स्टेशन परिसरात देहविक्रय करत असल्याची माहिती मिळाली. तपासात चौहानने तिचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौहानला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, सुडगे, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×