Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू

फ्लॅटमध्ये किटक नाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्यचा संशय

marathinews24.com

पुणे – फ्लॅटमध्ये किटक नाशक फवारणी केल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.

कुख्यात घायवळविरूद्ध १०, आंदेकरविरूद्ध १३ गुन्हे – सविस्तर बातमी 

रवींद्र बबन जाधव (वय २६, रा. इंदापूर, जि. पुणे) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी असून, तो सध्या सोलापुरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोर एका सोसायटीत राहणाऱ्या मित्राकडे आला होता. त्याचा मित्र सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मंगळवारी तो सदनिकेत झोपला होता. त्याने सदनिकेचा दरवाजा बंद केला होता. दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता.

त्याला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत सदनिकेत किटक नाशक फवारणी (पेस्ट कंट्रोल) केल्याची माहिती मिळाली. विषारी वायुमुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×