Breking News
Drought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटीलPune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडाSkill Development for Youth : कौशल्यसंपन्न युवा पिढी घडविणे हीच विकसित देशाची खरी गुरुकिल्ली- डॉ. विजय भटकर

Pune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाई

Pune Private Bus Fare

खासगी बसचे जादा भाडे आकारणे महागात पडणार; पुणे आरटीओची विशेष तपासणी मोहीम

marathinews24.com

पुणे – Pune Private Bus Fare : सणासुदीच्या व गर्दीच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून प्रवाशांची आर्थिक लूट करून शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा बसेसविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’ – सविस्तर बातमी 

या मोहिमेंतर्गत सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकूण ९२९ खासगी प्रवासी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१५ वाहने दोषी आढळली असून, जादा भाडे आकारणी करणाऱ्या 7 वाहनांसह संबंधित प्रकरणांमध्ये एकूण २५.८२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच १ नोव्हेंबर २०२६ पासून राबविण्यात येत असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ३०९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६५ वाहने दोषी आढळली असून, १४ वाहने जादा भाडे आकारताना आढळली. या कारवाईत ७.०४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

प्रवाशांनी तक्रार नोंदवावी

Pune Private Bus Fare खासगी प्रवासी बसेसकडून निर्धारित दरापेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्यास किंवा प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणी येत असल्यास प्रवाशांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व तिकिटाचा फोटो यासह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, मालक व प्रतिनिधींनी वाहनांची सर्व कागदपत्रे वैध ठेवावीत, शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारावे आणि परिवहन विभागाच्या तपासणी मोहिमेस आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×