Breking News
Pune Farmer Diwali Assistance 2026 : पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम मदतDrought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटीलPune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडा

Drought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटील

Drought Relief 2026 Maharashtra

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत

marathinews24.com

मुंबई – Drought Relief 2026 Maharashtra : राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. यानुसार ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत वितरित झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास त्या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरण – सविस्तर बातमी 

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबववून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यावर भर देण्यात आला. या मदतीमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.

अमरावती विभागातील १२ लाख ८२ हजार २०३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटी १० लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार १५२ शेतकऱ्यांना ८१ कोटी ८ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यातील ३ लाख ६ हजार ७०९ शेतकऱ्यांना १५३ कोटी ३५ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ८३३ शेतकऱ्यांना २१२ कोटी ९२ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ५०८ शेतकऱ्यांना ७९ कोटी ७५ लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख २८ हजार १ शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Drought Relief 2026 Maharashtra छत्रपती संभाजीनगर विभागातील ३३ लाख ३६ हजार ३६० शेतकऱ्यांच्या खात्यात १६६८ कोटी १८ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील ६ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ५ लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ लाख ४४ हजार ३८२ शेतकऱ्यांना २२२ कोटी १९ लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार ७२ शेतकऱ्यांना १७३ कोटी ५४ लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ७६० शेतकऱ्यांना १०६ कोटी ३८ लाख रुपये, जालना जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ८४४ शेतकऱ्यांना २१९ कोटी ४२ लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ९६१ शेतकऱ्यांना १९० कोटी ९८ लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ६२ हजार ८६८ शेतकऱ्यांना २८१ कोटी ४३ लाख रुपये आणि परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० शेतकऱ्यांना १६८ कोटी १९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

कोकण विभागातील ६३ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ कोटी ८२ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील ८ हजार २१३ शेतकऱ्यांना ४ कोटी ११ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील २ हजार २१८ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ४९४ शेतकऱ्यांना ११ कोटी २५ लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० हजार ७२२ शेतकऱ्यांना १५ कोटी ३६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

नागपूर विभागातील ७ लाख ५० हजार ४१ शेतकऱ्यांच्या खात्यात ३७५ कोटी २ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील १ लाख १५८ शेतकऱ्यांना ५० कोटी ८ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख ६२९ शेतकऱ्यांना १०० कोटी ३१ लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील ३० हजार ७८८ शेतकऱ्यांना १५ कोटी ३९ लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यातील ७४ हजार ९१० शेतकऱ्यांना ३७ कोटी ४६ लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार ७६६ शेतकऱ्यांना ९६ कोटी ३८ लाख रुपये आणि वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५० हजार ७९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

नाशिक विभागातील १८ लाख ७ हजार ३२ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०३ कोटी ५२ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांना ४०३ कोटी ६४ लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील ६५ हजार ९३० शेतकऱ्यांना ३२ कोटी ९७ लाख रुपये, Drought Relief 2026 Maharashtra जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ८ हजार ६३५ शेतकऱ्यांना २०४ कोटी ३२ लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख रुपये आणि नाशिक जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ६४९ शेतकऱ्यांना २०८ कोटी ८२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

पुणे विभागातील १५ लाख ६ हजार ३८६ शेतकऱ्यांच्या खात्यात ७५३ कोटी १९ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ हजार ८९३ शेतकऱ्यांना ३७ कोटी ४५ लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना १६४ कोटी २७ लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ६०० शेतकऱ्यांना १०३ कोटी ३० लाख रुपये, सातारा जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४६७ शेतकऱ्यांना १५० कोटी ७३ लाख रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख ९४ हजार ८८४ शेतकऱ्यांना २९७ कोटी ४४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करून त्यांना अग्रीम मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×