आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार

marathinews24.com

पुणे – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांचा सत्कार केला.

युवोन्मेश मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये कुटुंबाला भेट देऊन शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विशेष प्रक्रिया राबवून आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२) पदावर नियुक्ती दिली. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी आसावरी यांनी उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही कुटुंबाला पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. आसावरीने नोकरी मिळाल्याबद्दल कुटुंबीयांच्या भावना व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.याप्रसंगी बाळासाहेब भांडे, आनंद गोयल, एकनाथ ढोले, विठ्ठल तांबे, ज्योती गाडे, सोनाली लांडगे, रिंकू मोरे आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

२६ मार्च हा संतोष जगदाळे यांचा स्मृतिदिन असून, सरकारने दिलेली ही नोकरी त्यांना आदरांजली असल्याचे जगदाळे कुटुंबीयांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यात २२ एप्रिल २०२५ रोजी संतोष जगदाळे यांच्यासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले की, पहलगाम हल्ला असो वा इराण युद्धासारखे संकट असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पीडित नागरिकांच्या मदतीला धावून जातात आणि त्यांना सुखरूप बाहेर काढतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×