Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात लाच प्रकरण दोन्ही डॉक्टरांकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड…

आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, एसीबीकडून चौकशी

Marathinews24.com

पुणे- ससून रुग्णालयातील बी. जे.वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या फर्निचरच्या कामाचे देयक मंजूक करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहायकाने १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाखांची लाच स्वीकारताना दोघांना बुधवारी महाविद्यालयाच्या आवारात पकडले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. अटक केलेल्या दोन्ही आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये आरोपीकडे कोट्यावधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे तपासात समोर आली आहे.

दरवाजे उघडे ठेवणे पडले महागात सव्वातीन लाखाची चोरी – सविस्तर बातमी

कार्यालयीन अधीक्षक सुरेश विश्वनाथ बाेनवळे यांच्या घराची किंमत, सोने चांदी, वाहन अशी मिळून १ कोटी ३५ लाख ९५ हजार तर वरिष्ठ सहायक जयंत पर्वत चौधरी यांच्याकडे ३९ लाख रूपयांची मालमत्ता मिळून आली आहे. व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार फर्निचर व्यावसायिक आहे. २०२३ मध्ये त्यांनी वीस लाख रुपयांचे फर्निचर महाविद्यालयास दिले होते. एकूण देयकापैकी दहा लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी बोनावळे आणि चौधरी यांनी।व्यावसायिकाकडे एक लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रार देण्यात आल्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली.

चौकशीत बाेनवळे, चौधरी याने लाच मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या बाेनवळे आणि चाैधरी यांना पकडण्यात आले. दोघांविरुद्ध रात्री उशीरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत. तर आज न्यायालयासमोर दोन्ही आरोपींना हजर केले असता, ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×