Breking News
Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन

marathinews24.com

पुणे – ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला गुरुवारी (दि. २८) अनोख्या प्रदर्शनाने सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, चित्रांचे तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन बाल साहित्यकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ल. म. कडू यांच्या हस्त झाले.

दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण – सविस्तर बातमी

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती, काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींचे तसेच गणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन या निमित्ताने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार दि. ३१ऑगस्ट पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. श्रीनिवास अरविंद पतके यांच्या गणेशोत्सवातील छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे.

उद्घाटन समारंभास संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिॲलिटीच्या प्रतिनिधी धनश्री फाटक, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सहसंवाद पुणेच्या केतकी महाजन- बोरकर, छत्रपती संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमाचे कौतुक करून उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना ल. म. कडू म्हणाले, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागण्यास मदत होईल. मोठ्यांसाठी महोत्सव आयोजित केले जातात, परंतु शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी आयोजित केलेला गणेश फेस्टिव्हल हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.

सुनील महाजन म्हणाले, ‌‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ या उपक्रमाअंतर्गत कोथरूड परिसरातील ३० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. काही शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली. उपक्रमांना विद्यार्थी तसेच शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी मुले तसेच पालकांसाठी फोटो कॉर्नर, गाणी, कवितांचे रेकॉर्डिंग करण्याची, शुभेच्छा देण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा, धनश्री फाटक यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×