Breking News
Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालतPune Police Crime News : दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्नAhilyadevi Holkar Karj Mukti Yojana : कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाPune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्रीPune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Baner Police : बाणेर पोलिसांची तत्परता आली कामी

तक्रारदाराला ३ लाख रुपये मिळवून दिले

marathinews24.com

पुणे – पॉलिसी रकमेचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराची ६ लाख ७० हजारांची ऑनलाईनरित्या फसवणूक केली होती. मात्र, याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे संबंधित ३ लाख ३ हजारांची रक्कम बँकखात्यात गोठवण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया राबवून तक्रारदाराला ही रक्कम परत मिळवून देण्यात आल्यामुळे त्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष, ३१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला पॉलिसीचे आमिष दाखवून पावणे ७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. बाणेर पोलिसांच्या सायबर तपास पथकाने गोल्डन अव्हरर्समध्ये संबंधित बँकेसह वित्तीस संस्थेकडे तत्काळ पत्रव्यवहार केला. पाठपुरावा करीत केंद्र सरकारच्या एमआरएम पोर्टलवर तातडीने कार्यवाही केली. त्यानुसार विविध बँकखात्यात वर्ग झालेली ३ लाख ३ हजारांची रक्कम गोठवली. रक्कम नुकतीच तक्रारदाराला मिळवून दिली. ही कामगिरी उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे, एपीआय नंदकुमार कदम, एएसआय शिंदे, दत्ता काळे, योगिता मिसाळ यांनी केली.

येरवडा पोलिसांमुळे वाचले १२ लाख रुपये

डिजीटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेत तब्बल १२ लाख ५० हजार रुपये वर्ग करण्याचा सायबर चोरट्यांचा डाव येरवडा पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलीस असल्याची बतावणी करीत संबंधितांनी तक्रारदाराला तुमचे एटीएम कार्ड आरोपीकडे मिळाल्याचे सांगितले. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अटक टाळायची असल्यास बँकखात्याची माहिती द्या, नाहीतर डिजीटल अरेस्ट करुन अशी धमकी दिली.

तक्रारदाराने येरवडा ठाण्यात धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ बँकखाते ब्लॉक केल्यामुळे तरुणाने १२ लाख ५० हजार रुपये वाचले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे, पोलीस निरीक्षक केशव दिंडे, उपनिरीक्षक गणेश राठोड, समीर पिलाणे, मनोज भागवत, रोहिणी भोकसे, मीनाक्षी कापडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×