Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Baramati Wrestling Gold Medal 2026 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी

Baramati Wrestling Gold Medal 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरव

marathinews24.com

बारामती – Baramati Wrestling Gold Medal 2026 : राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बारामती तालुक्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचा पालकमंत्री सुनिता अजित पवार यांच्याकडून गौरव करण्यात आला.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळ – सविस्तर बातमी 

दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारामतीच्या दोन खेळाडूंनी पदकांची कमाई केली, तर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत एका खेळाडूने देशात प्रथम क्रमांक पटकावून बारामतीचा नावलौकिक वाढविला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कु. श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश संपादन केले. तर कु. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.

खेळाडूंनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. (Baramati Wrestling Gold Medal 2026) राष्ट्रीय स्तरावर बारामतीच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर बारामतीचे नाव उज्ज्वल केले. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन सातव, संभाजी नाना होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती तालुका दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, मलारी बंडलकर आणि सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे तसेच पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×