भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा जागर; सप्ताहाचा समारोप सोहळा उत्साहात
Marathinews24.com
पुणे– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडीत आयोजित अभिवादन कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाचा समारोप केला. यावेळी प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण वंदना कोचुरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणेचे उपायुक्त संजय दाणे, संशोधन अधिकारी संतोष जाधव, सहायक आयुक्त विशाल लोंढे, सहायक लेखाधिकारी इंदल चव्हाण उपस्थित होते.
उरळी देवाची परिसरात भंगार साठ्याला आग – सविस्तर बातमी
कोचुरे यांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती साजरी करण्याचा हेतू बाबत माहिती दिली. महामानवांचे कार्य, त्यांचे विचार, आपल्या कडून अपेक्षित असलेल्या वर्तवणूकीचे मार्गदर्शन केले.
दाणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विविध महाविद्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचे विशेष शिबिरांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लोंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचार घेवून जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये परदेशी शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यास सहकार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था, पारलिंगी व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, पुणे शहरातील वृध्दाश्रमाचे संचालक, मिनी ट्रॅक्टर योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणेत आले. सानिका जाधव यांनी”मी रमाई बोलतेय” हा एकपात्री नाटकाचा प्रयोग सादर केला.