Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची १२ लाखांची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची १२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ११ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सायबर. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिडीतील वारकऱ्यांचे मोबाइल चोरणारे अटकेत; मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८५ वर्षीय तक्रारदार बिबवेवाडी भागात राहायला असून, ते निवृत्त आहेत. काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यामुळे ते एकटेच राहतात. त्यांना पुनर्विवाह करायचा होता. त्यांनी १८ एप्रिल रोजी एका विवाहविषयक संकेतस्थळाची माहिती घेतली होती. संकेतस्थळाशी त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित महिलेने विवाहनोंदणीसाठी १५०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठाने १५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. तेव्हा त्या महिलेने आणखी एका महिलेचा मोबाइल क्रमांक दिला. ज्येष्ठ नागरिकाने त्या महिलेशी संपर्क साधला. तिने विवाहाच्या आमिषाने जाळ्यात ओढले.

त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मावसबहीण आजारी असून, कोल्हापूर येथे आल्याचे तिने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने अपघात झाल्याची बतावणी केली. वैद्यकीय उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. पुण्यात आल्यानंतर पैसे परत करते, असे सांगून तिने ज्येष्ठाकडे पैसे मागितले. ज्येष्ठाने तिच्या बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ४५ हजार रुपये जमा केले. पुण्यात आल्यानंतर पैसे परत करीन असे सांगत तिने वेगवेगळे बहाणे करून पुन्हा पैशांची मागणी सुरू केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×