Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे पोलिसांकडून वारकर्‍यांचे स्वागत

marathinews24.com

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज मोठ्या दिमाखात पुण्यनगरीत दाखल झाला. धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, माउलींसह तुकोबांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. दोन दिवस वारकर्‍यांची सेवा करणे हीच मोठी संधी असल्याची भावना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. संचेती चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले, यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुनर्रचित हवामानावर आधारीत फ़ळपिक विमा; योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष…टाळ-मृदंगाचा निनाद…अखंड भजनाचा निनाद करीत राज्यभरातून आलेले वारकरी हरि नामघोषात श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी लाखो नागरिक मदतकार्य करीत आहेत. अशाच पद्धतीने पुणे पोलिसांनाही वारकर्‍यांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. भाविकांसह वारकर्‍यांची तन मनाने सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे भाग्यच आहे. पांडुरंगा विठ्ठला मायबापा तुझ्या चरणी आमची सेवा फलशृष होण्यासाठी वारकरी दुवा ठरले आहेत. त्यांचा आणि माउलींचा आशार्वाद कायम मिळो, हीच प्राथर्ना करतो, असे म्हणत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांचे स्वागत केले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरू संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत चोखोबा, संत सावता, संत निवृत्ती, संत एकनाथ महाराजांनी आधुनिकेची कास धरणारी शिकवणूक दिली आहे. साधुसंत येति घरा तोचि दिवाळी दसरा असे म्हणत सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी वारकर्‍यांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभल्याने आत्मिक आनंद झाल्याचे सांगितले. माउलींचा आशार्वाद कायम नागरिकांना मिळो, हीच प्राथर्ना असे म्हणत त्यांनी वारकर्‍यांचे पुणे पोलिसाच्यावतीने स्वागत केले.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त, वारकरी वेशातही पहारा

पालखी सोहळ्यानिमित्त पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः वारकर्‍यांची वेशभूषा करीत महिलांसह पुरुष अमलदारांकडून वारकर्‍यांसह भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले होते. वाहतूक नियोजन, बॅरिकेटींग, चौकाचौकात पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी, गुन्हे शाखेच्या विविध पथकांसह दामिनी पथकांकडून महिला छेडछाड रोखणे, पाकिटमार, चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी प्राधान्य दिले. गुन्हे शाखेचे अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×