Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

टँकरमधून मद्यार्क चोरी प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात

marathinews24.com

बारामती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

जुन्या भांडणातून तरूणावर वार, टोळक्याविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा येथे मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्विफ्ट डिझायर (एमएच-01-बीएफ-9165) वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात मध्यप्रदेशात विक्रीस परवानगी असलेले, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा आढळून आला. रॉयल स्टॅग व्हिस्की (180 मिली) चे 11 बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू (180 मिली) चे 4 बॉक्स आणि मॅकडॉवेल नं. 1 (180 मिली) चे 5 बॉक्स मिळून एकूण 20 बॉक्स जप्त करण्यात आले.

गाडी आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी रामसिंह मोहबतसिंह राजपूत आणि महिपालसिंह राजसिंह राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे आणि टी. एस. काळे सहभागी होते. पुढील तपास श्री. गिरीशकुमार कर्चे करीत आहेत, अशी माहिती शहाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×