Breking News
Traffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

जुन्या भांडणातून तरूणावर वार, टोळक्याविरूद्ध गुन्हा

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

आरोपीला सहकारनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३ डिसेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास धनकवडीतील बालाजीनगरात घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य काका गायकवाड (वय १९ रा. धायरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आर्यन रवींद्र लोखंडे (वय १९, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे जखमीचे नाव आहे. त्याने फिर्याद दाखल केली आहे.

वडगाव शेरीत घरफोडी, ऐवज केला चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा कुल्फी विक्रीच्या गाडीवर कामाला असून, जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने ३ डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास त्याला बालाजीनगरात गाठले. लोखंडी शस्त्र काढून त्याच्या दोन्ही हातासह मांडीवर, पाठीवर, मानेवर वार केला. आर्यनला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने टोळक्याने हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, उर्वरित अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×