पुण्यात टेलिग्रामवर ‘बोर्ड पेपर’ विक्री

पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक

तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेलिग्रामवर ग्रुप तयार करून क्यूआर कोडद्वारे पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासादरम्यान टेलिग्राम कंपनीशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून संशयिताचा शोध घेतला. तपासातून आरोपीचे बँक खात्याशी संबंधित तपशील मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ चंद्रपूर येथे रवाना केले. तपासात चैतन्य विनोद शेंडे ( १८, रा. जातपुरा, चंद्रपूर) याने टेलिग्रामवर “ महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स’ नावाचा ग्रुप तयार केल्याचे उघड झाले.

मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार – सविस्तर बातमी 

ग्रुपवर तो बोर्डाच्या पेपरची पीडीएफ टाकत असल्याचा बनाव करून फाइल अपलोड करत असे आणि पासवर्ड लावून ठेवत असे. पेपर मिळवण्यासाठी इच्छुकांकडून तो प्रति पेपर ६०० रुपये मागत होता. यासाठी तो क्यूआर कोड पाठवून यूपीआयद्वारे पैसे मागत असे. तपासात chaitanya03@fam तसेच फोनपेवरील दुसऱ्या यूपीआय आयडीद्वारे व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित खात्याची माहिती घेतली असता ते खाते चैतन्य शेंडे याच्याच नावावर असल्याचे स्पष्ट झाले. फसवणुकीसाठी आरोपी आधी एक पीडीएफ फाइल अपलोड करत असे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेला खरा पेपर त्या फाइलमध्ये एडिट करून अपलोड करत असल्याने फाइलची वेळ पूर्वीचीच दिसत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर आधीच उपलब्ध असल्याचा भास निर्माण होत होता. काही जणांकडून पैसे मिळाल्यानंतर आरोपी त्यांना ब्लॉकही करत होता. प्रकरणात आरोपीने किती विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे याचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर व त्यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×