Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

उपजिल्हाधिकारी यांच्या नावाने मागितली लाच

पुण्यात माजी महिला मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

marathinews24.com

पुणे – वाटपपत्राच्या नोंदीच्या निकालाची प्रत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी तसेच स्वत:साठी १ लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी माजी महिला मंडळ अधिकारी यांना लाचलाचुपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. संबंधित निवृत्त महिला मंडळ अधिकारी कंत्राटी पद्दतीने तेथे काम करत आहेत. मंगळवारी (दि.३०) ही कारवाई करण्यात आली. सुनंदा अशोक वागसकर-येवले (वय ६१, रा.मुंढवा) यांना अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७अ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘डीएसके’ प्रकरणातील ठेवीदारांची यादी संकेतस्थळावर – सविस्तर बातमी

तक्रारदार शेतकरी असून त्यांच्या ६२ वर्षीय मामे बहिणीच्या वडिलोपार्जित जमिनीचे झालेल्या वाटप पत्राच्या नोंदीची केस भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे कार्यालयात सुरू आहे. केसची सुनावणी पुर्ण झाली आहे. केसच्या निकालाची प्रत त्यांनी मागणी केली होती.

दरम्यान, सुनंदा वागसकर भंडारे यांच्या कार्यालयात नोकरीस आहेत. त्या माजी मंडळ अधिकारी म्हणून २०२३ ला निवृत्त झाल्या आहेत. पण, भूसंपादन विभागाने पुन्हा त्यांना येथील कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने नेमले आहे. दरम्यान त्यांच्याकडे निकालाची प्रत मागण्यात आली होती. त्यावेळी लोकसेविक सुनंदा यांनी तक्रारदारांकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली होती.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, त्यात लोकसेविका सुनंदा यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत:साठी ५० हजार तसेच उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी ५० हजार अशी १ लाखांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, एसीबीने सुनंदाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. आता एसीबीकडून नेमका उपजिल्हाधिकारी यांचा या लाचप्रकरणात सहभाग आहे का, याचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×