Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

घरगुती वीजकनेक्शन मंजुरीसाठी २५ हजारांची लाच

घरगुती वीजकनेक्शन मंजुरीसाठी २५ हजारांची लाच

सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले

marathinews24.com

पिंपरी – घरगुती वीजकनेक्शन मंजूर करून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. स्पाईन सिटी, भोसरी येथील महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

मेफेड्रॉनसह एकजण अटकेत – सविस्तर बातमी 

सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३४) आणि खासगी इसम श्यामलाल असोकन (वय ३४, रा. बोराटेवाडी, मोशी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका सरकारी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महावितरणच्या मंजुरीसाठी लायझनिंग व कनेक्शनची प्रक्रिया हाताळणारे शासकीय ठेकेदार आहेत. ४ जून रोजी त्यांनी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी भोसरी येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता.

संबंधित अर्जाची फाईल सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी आली होती. त्यांनी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी ३५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम २५ हजार ठरली. त्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पथकाने गुरुवारी सापळा रचून महावितरण कार्यालयात ही कारवाई केली.

नरवडे व त्यांचा साथीदार असोकन हे दोघेही २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×