Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळला

पोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळला

आईच्या आजारपणासाठी मागितला होता तात्पुरता जामीन

marathinews24.com

पुणे – मद्यधुंद अवस्थेत अलिशान मोटार पोर्शे कार चालवून दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तरूण-तरूणीचा मृत्यू झाला होता. या हायप्रोफाईल प्रकरणात ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचे रक्तनमुने बदलण्यात सहभागी असलेला मुख्य आरोपी बिल्डर विशाल संजय अगरवाल याने आपल्या आजारी आईच्या देखभालीसाठी २१ दिवसांच्या तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पुणे सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.

माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेश – सविस्तर बातमी 

विशाल अगरवालने भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४३९ अंतर्गत तात्पुरता जामीन मागितला होता. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, त्याच्या आईला स्पाईन शस्त्रक्रियेची गरज असून, ती उच्च धोका असलेल्या सर्जरींपैकी एक मानली जाते. तसेच, त्याची पत्नी शिवानी अगरवाल हिला आधीच मानसिक अस्वस्थतेच्या कारणामुळे तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आईची देखभाल करण्यासाठी विशाल अगरवालची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या अर्जाला तीव्र विरोध केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या आईचा आजार हा वयजन्य असून ती सध्या गंभीर अवस्थेत नाही. ही शस्त्रक्रिया आधीपासून नियोजित असल्यामुळे ती आपत्कालीन परिस्थिती मानता येत नाही. शिवाय, आरोपीच्या कुटुंबात वडील, बहिण, मुलगा, मेहुणा आणि पत्नी अशी इतर मंडळी आहेत, त्यामुळे आईच्या देखभालीसाठी विशाल अगरवालची गरज भासत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात पीडितांचे आणि आरोपीचे हक्क यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. सध्या विशाल अगरवाल याला जामिनावर सोडणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत, त्याचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×