Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेश

माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेश

कुटूंबीयांसह, कार्यकर्त्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

marathinews24.com

पुणे – शहरातील चंदननगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मानॉरीटीच्यावतीने शिष्टमंडळाने बुधवारी ३० जुलैला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी माजी सैनिक असलेल्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींनीनी पोलीस आयुक्तांसमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला. घटनेबद्दल खेद व्यक्त करत सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबाच्या बाबत अशा प्रकारची घटना होणे अत्यंत वाईट आहे. अशा प्रकारची कृती करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

तब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल – सविस्तर बातमी 

चंदननगर येथे २६ जुलैला शमशाद शेख यांच्या घरामध्ये घुसून बजरंग दल , विश्व हिंदू परिषद व इतर सकल हिंदू समाज वडगाव शेरीच्या नावाखाली स्वतःला हिंदुत्वादी म्हणवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींनी गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी सदर कुटुंबीयांना रोहिंग्या, बांगलादेशी असे संबोधून त्यांची अवहेलना केली होती. यासंदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने संबंधित कुटुंबीयांनी नॅशनल कॉन्फरन्सचे राहुल डंबाळे यांच्या उपस्थितीत आज पोलीस आयुक्त यांची भेट घेतली यावेळी सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व अपर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील उपस्थित होते.

यावेळी मानवी हक्क कार्यकर्ते अँड. असीम सरोदे, शहाबुद्दीन शेख, वसिम सय्य्द, अफजल खान, अझहर खान, मुफ्ती शाहीद , ॲड. तौसिफ शेख, आतिफ शेख, जावेद शेख, फिरोज खान, करिम शेख, समिर शेख , अस्लम सय्यद , सुफीयान तांबोळी , शारुख शेख , सादमान खान, साहील खान , इम्तियाज खान , हुसैन शेख. इत्यादी लोक सहभागी होते

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरांमध्ये अशा प्रकारची कोणतीही धार्मिक विद्वेशाची कृती खपवून घेतली जाणार नाही. कायद्याप्रमाणे जे वागणार नाहीत व चुकीची माहिती व दिशाभूल देणारी माहिती देऊन स्वतःचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही धार्मिक भीतीच्या छायेत राहू नये , समाजकंटकांवर कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत असा विश्वास यावेळी त्यांनी शिष्टमंडळात दिला.

राहुल डंबाळे म्हणाले, अलिकडच्या काळात पुणे शहरातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटनांमध्ये वाढ करून शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम त्याच त्या व्यक्तींकडून व संघटनांकडून केला जात असल्याने अशांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान समाजकंटक व धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांच्या विरुद्ध या पुढील कालावधीमध्ये अधिक ताकतीने लढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×