पुण्यात बुलेटराजा कारवाईच्या तडाख्यात

फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध हडपसरमधील ससाणेनगर परिसरात कारवाई करण्यात आली. बुलेट चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्रीकृष्ण खोकले यांनी फिर्याद दिली असून, दोन बुलेट चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ९ च्या मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात झुरळ – सविस्तर बातमी

आरोपींनी बुलेटच्या सायलेेन्सरमध्ये फेरफार केले होते. फटाक्यांसारखे आवाज काढून दोघे जण भरधाव वेगाने हडपसमधील काळेपडळ परिसरातून निघाले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाहन परवाना, तसेच दुचाकीची कागदपत्रेही नव्हती. या प्रकरणी आरोपींना नोटीस दिल्याची माहिती हवालदार श्रीकृष्ण खोकले यांनी दिली. सायलेन्सरमध्ये फेरफार करून भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. फटाक्यांसारखे आवाजामुळे नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना त्रास होतो. यापूर्वी पोलिसांनी कारवाई करून फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त केले होते. जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×