सराईत घरफोड्याला अटक, ८ गुन्ह्यांची उकल

सराईत घरफोड्याला अटक, ८ गुन्ह्यांची उकल

सिंहगडरोड पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरासह पुणे ग्रामीण, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी घरफोडी, वाहन चोरीसारखे १७ गुन्हे दाखल असलेल्या सराईताला सिंहगडरोड पोलिसांनी दिघी रोड येथून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शहरातील सिंहगडरोड पोलिस ठाण्यातील पाच, भारती विद्यापीठ एकख उत्तमनगर पोलिस ठाण्यातील दोन असे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून १४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (२४, रा. राधानगरी सोसायटी, दिघीरोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

नात्यातील महिलेची छेड काढल्याने केला खून – सविस्तर बातमी

सिंहगडरोड येथील आनंदनगरमधील आशिष अपार्टमेंटमध्ये २० मे रोजी घरफोडी झाली होती. त्याच अनुषंगाने सीसीटिव्ही फुटेज एकत्रीत करून तपास करत असताना आरोपीने काळ्या रंगाचे जॅकेट व काळ्या रंगाचे हेल्मेट परिधान करून रात्रीच्यावेळी पहाटे २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी सातत्याने येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटटिव्ही फुटेजच्या साह्याने सिंहगड पोलिसांनी आरोपीचा माग काढला. दि. ८ ऑगस्ट रोजी पोलिस अमंलदार देवा चव्हाण, राहुल आलेकर, निलेश भोरडे, तानाजी सागर यांना बातमी मिळाली.

आनंदनगर येथील घरफोडी करणारा आरोपी दिघी येथील राधानगरी थांबला आहे. ही माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळवली. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलिस अंमलदार उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, सारगर शेडगे, विनायक मोहिते, तानाजी सागर, संदिप कांबळे यांच्या पथकाने आरोपीला दिघी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या चौकशीत शहरातील आठ तर शहरासह इतर जिल्ह्यातील १७ गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून ५ लाख ७१ हजारांचे सोन्याचे दागिने, रोख रकमेतून खरेदी केलेली हुंदाई कंपनीची वेनु कार व त्या गाडीच्या अ‍ॅक्सीसरीज साठी त्याने १ लाख ८२ हजार रूपये खर्च केले. ती गाडी या गुन्ह्यात जप्त करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. घरफोडीसाठी वापरलेले साहित्य असा १४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सराईत सोनटक्केच्या नावावर १७ गुन्हे

पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी घरफोडी चोरीचे १७ गुन्हे दाखल आहेत. त्याने पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल आहे. शहरात घरफोडी चोरी सारखे गुन्हे घडत असताना पोलिसांनी नागरिकांना सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तु घरी न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवावे, गावी जाताना शेजारी लोकांना सांगून जावे, आपली सोसायटी आपले सीसीटिव्हीच्या गिराणीत राहिल याची काळजी घ्यावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×