Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

समर्थ पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – शहराच्या मध्यभागात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सोहेल समीर शेख (वय २६, रा. पत्रा चाळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नाना पेठ परिसरात घरफाेडीची घटना घडली होती. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा समर्थ पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शेख याला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. शेख याच्याकडून ९० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. शेख याने घरफोडीचे आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे, सहायक निरीक्षक धीरज राऊत, संतोष पागार, रवींद्र ओैचरे, रोहिदास वाघेरे, शिवा कांबळे, अमोल गावडे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×