Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यातील वेगवेगळ्या भागात घरफोडी

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

रोकड, दागिन्यांसह ४२ लाखांचा ऐवज लंपास

marathinews24.com

पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ४२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. ऐन दिवाळीत चोरट्यांनी नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई, कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या. बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी भागातील एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख २० हजारांची रोकड लांबविली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेत मांडलेले दागिने, रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. याबाबत व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुख्यात नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा वाडेबोल्हाई-राहू रस्त्यावर बंगला आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी पूजा मांडली होती. प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी पूजेतील ऐवज पुन्हा कपाटात ठेवला जाणार होता. तत्पूर्वी चोरट्यांनी मध्यरात्री स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. देवघरात मांडलेल्या पूजेतील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी व्यावसायिकाच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

कोथरूड भागात सदनिकेतून चोरट्यांनी ८ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील लोकमान्य काॅलनीत एका सोसायटीत राहायला आहे. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविला. लक्ष्मीपूजनाच्या पूजेत दागिने मांडण्यात येणार असल्याने महिलेने कपाटातील कप्पा उघडला. तेव्हा दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस कर्मचारी माळी तपास करत आहेत.

हडपसर भागातील अलकुंटे वस्ती परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील नऊ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) घडली. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८० हजार रुपयांची रोकड लांबविली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.

बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील दोन लाख २० हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल असा २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×