Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

कुख्यात नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द

कुख्यात नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द

कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ परदेशात झाला पसार

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड गोळीबार प्रकरणात परदेशात पसार झालेला गुंड नीलेश घायवळ याचे पारपत्र पारपत्र कार्यालयाने रद्द केले.
पुणे पोलिसांनी घायवळचे याचे पारपत्र रद्द करण्यासाठी पारपत्र कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानंतर पारपत्र कार्यालयाने त्याचे पारपत्र रद्द केले, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. १७ सप्टेंबरला घायवळ टोळीतील गुंडांनी कोथरूड भागातील तरुणावर गोळीबार केला होता, तसेच एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजविली होती. प्रकरणात घायवळ टोळीतील गुंडांना अटक केली होती. या प्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन यांच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे.

गुलटेकडीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

कुख्यात घायवळला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जागतिक गुन्हेगारी पोलीस संघटनेशी (इंटरपोल) संपर्क साधला असून, त्याला ब्ल्यू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळचा शोध घेण्यात आला. तेव्हा घायवळने ‘घायवळ’ ऐवजी ‘गयावळ’ या नावाने पारपत्र काढले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढल्यानंतर घायवळ युरोपात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. घायवळचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. घायवळचे पारपत्र रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी पारपत्र कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानंतर पारपत्र कार्यालयाने गुरुवारी त्याचे पारपत्र रद्द केले.

घायवळचा भाऊ सचिन हा ‘मकोका’ कारवाईनंतर पसार झाला असून, त्याचाही ठावठिकाणाा लागलेला नाही. सचिन हा शाळेत क्रीडाशिक्षक आहे. घायवळ, त्याचा भाऊ सचिन यांच्यासह साथीदारांविरुद्ध महिला व्यावसायिकाला धमकावून ४४ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून १० फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घायवळने अहिल्यानगर ग्रामीण पाेलीस दलातील अहमदनगर विभागातून बनावट कागदपत्रे सादर केली. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाने बनावट कागदपत्रे सादर करून २०१९ मध्ये घायवळने पारपत्र मिळवले. अहमदपूर पोलिसांनी पारपत्र पडताळणी (पासपोर्ट व्हेरिफिकेशन) केली होती. या प्रकरणाची पुणे पोलिसांकडून चाैकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत अहमदपूर येथील विशेष शाखेतील पारपत्र विभागात कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×