कात्रज, मांजरी भागात घरफोडी

साडेसहा लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, कात्रज, मांजरी भागातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि मांजरी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज भागातील निंबाळकरवाडी परिसरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराइताविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे निंबाळकरवाडी भागातील ऑरा नेस्ट सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी २० डिसेंबर रोजी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने, रोकड असा एक लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

हडपसरमधील मांजरी बुद्रुक भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ५७ हजार रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मांजरीतील माऊली रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहेत. १० डिसेंबर रोजी त्या परगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. १८ डिसेंबर रोजी त्या गावाहून परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×