Breking News
Matang Reservation Protest : मातंग समाजाचा २९ सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी एल्गार महामोर्चाAtal Pension Yojana : महाराष्ट्रात अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीला गती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्नPune Traffic : धायरी, मुंढवा, हडपसर परिसरातील वाहतुकीतही बदलRegular Health Checkup : नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजाराचे धोके टाळण्यास मदत-डॉ. मृदुला जगतापआत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रमPune Ganesh Visarjan : पुण्यात १० हजार पोलिसांचा फौजफाटा, गर्दीच्या नियोजनाला विशेष प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमारVishrantwadi Theft : महापालिकेच्या व्यायाम शाळेतून साहित्य चोरीRTO Cyber Fraud : ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून ३ लाखांची फसवणूकTraffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराइताविरुद्ध गुन्हा

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराइताविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नगर रस्ता भागात ही घटना घडली होती. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाेळीबारात सराइत जखमी झाला होता. ओंकार दिलीप भंडारी (वय २६, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पादचारी जेष्ठाला गाठून लुटणार्‍या चोरट्याला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी सराइत असून, वाहन तोडफोडीचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो पसार झाला होता. चंदननगर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. शनिवारी सायंकाळी तो आव्हाळवाडी भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी तेथे रवाना झाले. पोलिसांनी सापळा लावला. तेव्हा भंडारी एका झुडपात लपला होता. त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. पोलस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेली गोळी भंडारीच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलिसांवर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×