पादचारी जेष्ठाला गाठून लुटणार्‍या चोरट्याला अटक

पादचारी जेष्ठाला गाठून लुटणार्‍या चोरट्याला अटक

वानवडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रस्त्याने चाललेल्या जेष्ठाला निर्जनस्थळी गाठून १५ ग्रॅम सोन्याची चैन चोरून नेणार्‍या दुचाकीस्वार चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील ऐवज आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. उमर नुर खान (वय १८ रा. नवाधिश पार्क कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना १२ डिसेंबरला रामटेकडी परिसरातील मधुबन सोसायटीकडुन हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणारे रोडवर घडली होती.

गुंड टिपु पठाण टोळीतील दोघांना बेड्या – सविस्तर बातमी  

तक्रारदार जेष्ठ नागरिक हे १२ डिसेंबरला रामटेकडी परिसरातील टेकडीजवळून जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार चार चोरट्यांनी त्यांना अडवून हाताने मारहाण केली. त्यांच्या गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढुन दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पथकाने तपासाला गती दिली. त्यानुसार पोलीस अंमलदार विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले व अभि चव्हाण यांना जेष्ठाला लुटणार्‍याची माहिती मिळाली. टोळक्यापैकी एकजण गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील पुलावर दुचाकीवर बसरून कोणाची तरी वाट पाहत थांबल्याची माहिती मिळाली.

वानवडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी उमर नुर खान याला ताब्यात घेत अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून पिवळ्या धातुची चैन मिळून आली. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, एपीआय उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे अर्शद सय्यद, रुपाली खेडकर, शैला ठेंगल यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×