सुमारे ४ लाखांचा ऐवज लंपास
marathinews24.com
पुणे – Bus Passenger Theft : एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून तीन लाक ९० हजार रुपयांची दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय महिला सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या रहिवासी आहेत. त्या बुधवारी (८ ऑगस्ट) सकाळी टेंभुणीहून एसटी बसने पुण्याकडे निघाल्या होत्या. अक्कलकोट ते स्वारगेट स्थानक या मार्गावरील बसमधून त्या प्रवास करत होत्या. Bus Passenger Theft प्रवासात चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीतून दागिने चोरुन नेले. स्वारगेट एसटी स्थानकात महिला बसमधून उतरल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी चोरीला
पीएमपी प्रवासी महिलेची ७० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४८ वर्षीय महिला वडगाव शेरीतील सोमनाथनगर परिसरात राहायला आहेत. त्या ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी महापालिका भवन परिसरातील थांब्यावरुन वडगाव शेरीकडे जाणाऱ्या पीएमपी बसमधून प्रवास करत हाेत्या. बसमध्ये प्रवेश करताना गर्दीत महिलेच्या हातातील ७० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरली. सहायक पोलीस निरीक्षक पालमपल्ली तपास करत आहेत.




















