Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

Pune Road Accidents : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

Pune Road Accidents

अपघातानंतर चालक पसार, पोलिसांकडून तपास सुरू

marathinews24.com

पुणे – Pune Road Accidents : शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खराडी आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. खराडी भागातील मुंढवा उड्डाणपुलाजवळ वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेंद्र नामदेव गायकवाड (वय ४२, रा. मते नगर, वडगाव शेरी) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई हनुमंत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

सांभाळण्यासाठी दिलेले श्वान परत न देता मागितली खंडणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे बुधवारी (८ ऑक्टोबर) सकाळी नऊच्या सुमारास खराडी भागातील मुंढवा उड्डाणपुूल परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३५ वर्षीय तरुणाची ओळख पटलेली नाही. Pune Road Accidents त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली. याबाबत पोलीस कर्मचारी बाळासाहेब भांगरे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून निघाला होता. त्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मदने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×