लोहगाव पोलिसांकडून दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Dog Extortion Case : सांभाळण्यासाठी दिलेले श्वान परत न देता साडेतीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी प्राण्यांच्या सांभाळ करणाऱ्या एका संस्थेच्या चालक महिलेसह दोघींविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पाॅस फाॅर लाईफ फाऊंडेशनच्या संचालक देवयानी उर्फ श्रृती लोणे, विश्वस्त शेला नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंढव्यात अवैध गॅसचे रिफिलिंग, ३ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय लोहगावमधील मोझेनगर भागात राहायला आहे. मोझेनगर भागात त्यांचा बंगला आहे. प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेचे कार्यालय लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे आहे. Dog Extortion Case जानेवारी महिन्यात तक्रारदार महिलेने संबंधित संस्थेला सात श्वान तात्पुरत्या स्वरुपात सांभाळ करण्यासाठी दिले होते. महिलेने संबंधित संस्थेच्या चालकांकडे महिलांकडे श्वान परत करण्याची मागणी नुकतीच केली. तेव्हा संबधित संस्थेतील चालक महिलांकडून तक्रारदार महिलांकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारादार महिलेला शिवीगाळ करुन धमकाविण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.




















