Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Illegal Gas Refilling : मुंढव्यात अवैध गॅसचे रिफिलिंग, ३ जणांविरुद्ध गुन्हा

Illegal Gas Refilling

रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

marathinews24.com

पुणे – Illegal Gas Refilling  : शहरातील मुंढवा परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचा धंदा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पाईपच्या साहाय्याने भरलेल्या सिलेंडरमधून थोड्या प्रमाणात गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरत होते. त्यानंतर हा गॅस परवानगीशिवाय विकला जात होता. या रिफिलिंगमुळे गॅस गळती आणि आग लागण्याचा धोका होता. याप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्र प्रताप सुंदर सिंग (वय ३८ रा. साई नगर, मुंढवा) मनकरम सुखराम सियाक (वय ३९ रा. सोमनाथ माळ चंदननगर) महेंद्र बाबूराम खिचड (वय १९ रा. साईनाथ नगर, खराडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पीएमपीएल बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलिंडर अवैधपणे भरण्याची व्यवस्था केली होती. संबंधित विभागाची परवानगी न घेता, फिलिंग पाईपच्या साहाय्याने भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. ७ ऑक्टोबरला सकाळी साडेनउच्या सुमारास पोलिसांना हा प्रकार उघडकीस आला. आरोपी परवानगीशिवाय गॅस काढून तो इतर सिलिंडरमध्ये भरत होते. (Illegal Gas Refilling) या प्रक्रियेत सुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते. गॅस गळतीमुळे आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका होता, ज्यामुळे जवळच्या रहिवाशांच्या सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण झाला होता.

पोलीस अधिकारी एकता बाबूराव साळुंके यांच्या तक्रारीच्या आधारे, मुंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १२५, २८७ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ आणि ७ अंतर्गत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी सांगितले की, अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी इतर भागांवरही लक्ष ठेवले जात आहे. बेकायदेशीरपणे सिलेंडर भरताना दिसल्यास नागरिकांना पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×