Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

केज पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

केज पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

८ जणांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड – रस्त्यावरील धाब्याजवळ जुगार खेळणाऱ्या ८ जणांना केज पोलिसांनी छापा मारून रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडील १ लाख ८८ हजार रुपये जप्त केले. त्यामध्ये ४ दुचाकी, ८ मोबाईल, ४२ हजार ५६० रुपयांची रोकड असा ३ लाख ३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुण्यात मतदान शांततेत; पोलिसांचा तगडा बंदोबस्त – सविस्तर बातमी 

कानडी रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या आडोश्याला काही लोक जुगार खेळत असल्याची पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार उमेश निकम, फौजदार अमिरोद्दीन इनामदार, जमादार महावीर सोनवणे यांच्या पथकाने १४ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास छापा टारला. यावेळी विकास बब्रुवान वाघमारे, गणेश ज्योतीराम पवार, किरण अनिल बडे (तिघे रा. क्रांतीनगर, केज), अक्षय रामभाऊ चाटे (रा. तांबवा ता. केज), इसाक रज्जाक शेख, सद्दाम खाजा पठाण (दोघे रा. कोकचपीर, केज), रामकीसन रंगनाथ कदम (रा. विठ्ठलनगर, केज), महेश नंदकिशोर कदम (रा. वकिलवाडी, केज) या आठ जणांना तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×