Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यात मतदान शांततेत; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुण्यात मतदान शांततेत; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

किरकोळ वादावादी वगळता गालबोट नाही

marathinews24.com

पुणे – राजकीय पक्षातील अटीतटीची लढत, तर दुसरीकडे गुन्हेगारी असलेल्यांना व्यक्तींच्या कुटूंबियात दिलेली उमेदवारीमुळे पुणे महापालिकेची निवडणूक चर्चेची ठरली आहे. मतदान प्रक्रिया मात्र शांततेत पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही ठिकाणच्या किरकोळ वादावादीच्या घटना वगळता कोठेही गालबोट लागले नाही. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बुधवारी रात्रीपासूनच बंदोबस्ताची आखणी केली होती. तर संवेदनशिल इमारतीतील मतदान केंद्रावर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुन्हेगारीचा धाक असलेल्या परिसरात खबरदारी घेण्यात आली होती. शिघ्रकृती दल, एसआरपीएफ, होमगार्ड, गुन्हे शाखेची पथके असा तब्बल १२ हजार पोलिसांचा फौजफाटा पोलिसांकडून तैनात होता.

राजा नसणे म्हणजे अराजक, अव्हेलेबल बेस्ट निवडा- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत – सविस्तर बातमी 

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसाेडे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली होती. मतदान सुरू असताना शहरातील सर्व घडमोडींचा आढावा वरिष्ठ पोलिस अधिकारी घेत होते. अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्वरीत तेथे पोलिस पोहोचतील, अशा पद्धतीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. तर शिवाजीनगर मुख्यालयात राखीव मनुष्यबळ ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रियेत अडथळा, गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडू देण्यात आला होता.

शहरासह उपनगरातील ९० संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. शीघ्र कृती दल (क्विक रिस्पाॅन्स टीम), तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विशेष पथक (स्ट्रायकिंग फोर्स) गस्त घालत होते. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर मतदार वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांकडून मतदान केंद्राच्या आतील, मतदान केंद्राच्या बाहेर आणि १०० मीटर परिसर असा त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात केला होता. महापालिकेची निवडणूक सर्वच राजकिय पक्षांसाठी अटीतटीची होती. काही लढती तर मंत्री, पुढाऱ्यासाठी प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. गुन्हेगार असलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी सुरूवातीपासूनच खबरदारी घेत गुन्हेगारांचा या निवडणूक प्रक्रियेवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव राहणार नाही याची विशेष काळजी घेतली होती.

पुणे शहर, उपनगरात ३ हजार ९८३ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. त्याठिकाणी प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तैनात केला होता. शहरातील ९१३ इमारतीत हे मतदान झाले. अशा प्रत्येक इमारतीवर दोन पोलीस कर्मचारी तैनात केले होते. तर प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षकांची गस्त होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तासह गुन्हे शाखेचे पथके साध्या वेशात गस्तीवर होती. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी अगोदरच ३ हजार ४३९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात केल्या होत्या. शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच साडेबारा हजार पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात होता. तसेच गृहरक्षक दलाचे ३ हजार २५० जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या तैनात होत्या.

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. १२ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तसेच मोठ्या प्रमाणात यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ वादावादीच्या घटना वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. – रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×