शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शासकीय सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी संधी

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, संवाद पुणे व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे तर्फे शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी नामांकने स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. शासकीय सेवेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र असून केवळ अभिजात, मराठी भाषेतील आणि १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्तीची पुस्तके ग्राह्य धरली जाणार आहेत. संकलित, संपादित, अनुवादित साहित्य तसेच ई-बुक, ऑडिओबुक स्वरूपातील साहित्य विचारात घेतले जाणार नाही.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर – सविस्तर बातमी 

नामांकने लेखक किंवा त्यांच्या परवानगीने प्रकाशकांकडूनच पाठविणे आवश्यक असून पुस्तकाच्या दोन प्रती व नामांकन अर्जासह पाठविणे अनिवार्य आहे. काव्यसंग्रह वगळता इतर साहित्य किमान १०० पाने असणे अपेक्षित आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ अशी आहे.

निवड समितीचा निर्णय अंतिम राहील व प्राप्त पुस्तके परत पाठविली जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत व्यंकटेश कल्याणकर (मो. 7798703952), माध्यम व प्रकाशन विभाग, यशदा, पुणे यांच्याशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×