Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर

डिजिटल पोलिस ठाण्यामुळे तपास वेगवान होणार

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. तसेच पोलीस ठाणे डिजिटल करण्यात आले आहेत. सर्व पोलीस ठाणे हे पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पुण्यातील दीपबंगला चौकात चोरट्यंचा धुमाकूळ – सविस्तर बातमी 

बीड जिल्ह्यातील मॉडलिंग पोलिसिंग हे व्हिजन २०२६ नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी ते जिल्हा पोलिस अधीक्षकपर्यंत ऑनलाईन करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून तपास करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यासाठी अद्यावत संगणक, प्रिंटर, लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह बीड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यासाठी १३४ संगणक, ५६ लॅपटॉप, ५६ ब्लॅक व्हाईट प्रिंटर, ४० कलर प्रिंटर आणि प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संगणक अद्यावत, उच्च प्रतीचे घेण्यात आले आहे. सर्व पोलिस ठाणे, उपविभागीय अधिकारी, आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाशी जोडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अद्यावत संगणक प्रिंटर देण्यात येणार असल्याने आता एका क्लिकवर हे सर्व सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे पोलीस ठाण्याच्या स्तरावरील प्रिंटिंगसाठी पोलिसांना पैसे लागणार नाहीत. जिल्हा स्तरावरून पेपर साहित्य दिले जाणार आहे. संगणक आणि प्रिंटर पुरविण्यात आल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तपास गतिमान होणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले आहे..बीड जिल्ह्यातील शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्यावत ड्रोन खरेदी करण्यात येणार आहेत. एखादी गंभीर गुन्हा घडल्यास तात्काळ सदर ठिकाणी ड्रोन पाठवून कारवाई केली जाणार असून यासाठी व्हिजन २०२६ चा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×