खरेदीच्या बहाण्याने आला अन दागिने चोरून गेला

खरेदीच्या बहाण्याने आला अन दागिने चोरून गेला

सराईताला अटक, १८ लाख ५० हजारांचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने महिलेच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना ७ जानेवारीला घडली होती. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने आरोपीला अटक करीत त्याच्याकडून १८ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित आरोपी सराईत असून, त्याच्याविरूद्ध यापुर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय ३९ रा. साई सोसायटी मांजरी खुर्द पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुण्यात चारठिकाणी फ्लॅट फोडले, ८ लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

सुपरमार्वेâटमध्ये खरेदीच्या बहाण्याने एकजण येरवडा परिसरातील जाधवनगरात ७ जानेवारीला गेला होता. त्यावेळी तक्रारदार महिलेने शिलाई मशिनवर पिशवीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने व रोकड चोरून चोरटा पसार झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १८ जानेवारीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोनमधील अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना आरोपीची माहिती मिळाली. हडपसर माळवाडी सिरम कंपनीजवळ एकजण सोने विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने धाव घेत जयेश चंद्रशेखर खिच्ची याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता सोन्याचे मोठे मंगळसुत्र, लहान मंगळसुञ, कानातील झुमके जोड सोन्याची अंगठी असे १३९ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी जप्त केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, एपीआय सी. बी. बेरड, उपनिरीक्षक एस.जे.तानवडे, कैलास चव्हाण, राजु पुणेकर, परेश सावंत, गणेश लोखंडे, दत्ताञय खरपुडे, मयुर सुर्यवंशी, राहुल इंगळे, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, संदिप येळे, विक्रांत सासवडकर यांनी केली.

घरफोडीचे ७ गुन्हे दाखल

आरोपी जयेश खिच्ची हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर हडपसर, चंदननगर, महाड शहर ( रायगड ) वानवडी, कोंढवा, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे ७ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत असून, गुन्ह्याची पद्धत तपासली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×