Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

पुण्यात निवडणूकीच्या रिंगणात गुन्हेगारी असलेल्या उमेदवारांचा बोलबाला

तब्बल १ हजार ५०० अर्जदारांवर गुन्‍हे; गंभीर गुन्‍हे दाखल असलेल्‍या ६० जणांवर पोलिसांचा वॉच

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे उमेदवारांनी किती गुन्‍हे दाखल आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी तब्बल २ हजार ६५० जणांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी तब्बल १ हजार ५०० अर्जदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ६० उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची- सचिव तुकाराम मुंढे – सविस्तर बातमी

गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी असोत वा निवडणुकीतून माघार घेतलेली असो, अशा सर्वांवर पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे. नामांकित तसेच नामचिन गुंड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविल्याचेही समोर आले आहे. या उमेदवारांच्या हालचाली, प्रचार पद्धती, संपर्क आणि जमाव जमविण्याचे प्रयत्न यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी, तसेच दहशत निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.

गजाच्‍या फोनाफोनीवर पोलिसांचे लक्ष

कुख्यात गुंड गजा मारणे हा पत्नीच्या विजयासाठी सक्रिय झाला असून, शहरात प्रवेशास मनाई असल्याने शहरालगतच्या गावातून कोथरूडमधील मतदारांना फोनाफोनी करून प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या असून, गुंड मारणे आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला तिकीट देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आधीच टीका सुरू आहे. त्यातच आता गजा मारणे स्वतः प्रचारात उतरल्याचे समोर आल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झालेल्या गजा मारणे याला अलीकडेच न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना काही अटी व शर्थी घालण्यात आल्या आहेत. त्यानूसार निवडणूक काळात त्याला शहरात प्रवेश करता येत नसून, तो शहराच्या हद्दीबाहेरूनच फोनाफोनी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदारांवर दबाव येतोत का यावरही लक्ष

कोथरूड परिसरातील अनेक मतदारांना गजा मारणे याचे फोन येत असून, पत्नीला मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. या फोनाफोनीमुळे मतदारांवर दबाव येत असल्याच्‍या तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉल्सची माहिती, संपर्क आणि हालचालींची तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बापू नायर, तसेच गुंड गजानन मारणे याची नातेवाईक निवडणुक लढवत आहे. अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. निवडणूक काळात दहशत, दबाव, बळाचा वापर किंवा आर्थिक प्रलोभनाच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी विशेष शाखा, स्थानिक पोलिस ठाणे आणि गुप्तचर यंत्रणा, गुन्‍हे शाखा समन्वयाने काम करत आहेत.

गुन्हेगारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणूकीवर प्रभाव पडणार नाही याची पोलिस दक्षता घेत आहेत. गजानन मारणे काही जणांना निवडणूकीच्या अनुषंगाने संपर्क करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार पोलिस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×