मृतदेह विटंबनाप्रकरणी शवागार प्रमुखासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

कोरेगाव पार्क पोलिसांनी केला  गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील बंडगार्डन रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविताना निष्काळजीपणा केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी खासगी रुग्णालयातील शवागाराचे प्रभारी, तसेच कर्मचाऱ्यांविरुद्ध विटंबना करणे आणि माहिती लपविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत यश कल्याण भगत (रा. माळेगाव, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

सोरतापवाडीच्या महिला सरपंचाच्या घरात हुंडाबळी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज येथील रुग्ण सुनिता भगत (वय २७) यांचे १९ जानेवारी रोजी रात्री खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. नातेवाइकांनी मृतदेह रात्री शवागारात (मॉर्च्युरी) ठेवण्याची विनंती केली होती. दुसऱ्या दिवशी २० जानेवारी रोजी दुपारी चारपर्यंत रुग्णालय प्रशासनाने मृतदेह सोपविण्याची प्रक्रिया (गेट पास) पार पाडण्यास टाळाटाळ केली. वादानंतर मृतदेह रुग्णालयाच्या शवागारातून देण्याऐवजी एका बाहेरून आलेल्या खासगी रुग्णवाहिकेतून नातेवाइकांसमोर आणण्यात आला. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह हाताळताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोरेगाव पार्क पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×