सोरतापवाडीच्या महिला सरपंचाच्या घरात हुंडाबळी

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या

marathinews24.com

पुणे – पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचाच्या सुनेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरपंच महिलेसह चौघांविरुद्ध ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीप्तीच्या आईने ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्येष्ठ महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोरतापवाडीतील कड वस्ती परिसरातव महिला सरपंच राहायला आहे. शनिवारी सायंकाळी दीप्ती चौधरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरकडील मंडळींकडून सुरू झाली होती. वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरू होता. आरोपींनी दीप्तीला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते, असेही दीप्तीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.

विवाहाच्या वेळी पन्नास तोळे सोन्याचे दागिने, रोकड दिली होती. हुंडा दिल्यानंतर तिला त्रास देण्यात येत होता. मानसिक दबाव आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर दीप्तीने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×