Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

ज्येष्ठ महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू भरधाव

पाषाण रस्त्यावर अपघात; वाहनचालक पसार

marathinews24.com

marathinews24.com

पुणे – फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) प्रवेशद्वारासमोर शनिवारी सकाळी घडली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. आशा विजयकुमार पाटील (वय ७३, रा. अभिमानश्री हाऊसिंग सोसायटी, पाषाण रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अतुल विजयकुमार पाटील (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकवर मोटार आदळून एकाचा मृत्यूv- सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील दररोज सकाळी घरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायच्या. शनिवारी (२४ जानेवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास त्या पाषाण रस्त्यावरून निघाल्या होत्या. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने पाटील यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपचारांपूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक धस तपास करत आहेत.

सोलापूर रस्त्यावर पादचारी तरुणाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यमुुखी पडलेल्या पादचारी तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २३ जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास थेऊर फाटा परिसरात अपघात झाला. ३५ वर्षीय तरुण सोलापूर रस्त्यावरून निघाला होता. तरुणाला धडक देऊन वाहनचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×