Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

ट्रकवर मोटार आदळून एकाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बाह्यवळण मार्गावर रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून मोटारीतील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भीमा राजेंद्र जाधव (रा. धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत मोटारचालक शुभम सुनील डुबळे (वय २७, रा. पूर्वा हाईट्स, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हवाई दलाच्या तळात प्रवेश करणे अंगलट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे दिवे घाट परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ते बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते. रस्त्यात अंधारात थांबलेला ट्रक मोटारचालक शुभम याला दिसला नाही. ट्रकवर माेटार आदळून मोटारचालक शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भीमा याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.

सोलापूर रस्त्यावर पादचारी तरुणाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यमुुखी पडलेल्या पादचारी तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २३ जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास थेऊर फाटा परिसरात अपघात झाला. ३५ वर्षीय तरुण सोलापूर रस्त्यावरुन निघाला होता. तरुणाला धडक देऊन वाहनचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×