Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

हवाई दलाच्या तळात प्रवेश करणे अंगलट

हवाई दलाच्या तळात प्रवेश करणे अंगलट

भिंतीवरुन पडल्याने तरुणाच्या पायाला दुखापत

marathinews24.com

पुणे – लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाच्या आवारात बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्याोका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवाई दलाच्या तळात प्रवेश करताना भिंतीवर चढलेला तरुण पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. याबाबत हवाई दलातील कनिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार सिंह (वय ४७) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका पंचवीस वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील टाटा गार्ड रुम परिसरात हवाई दलाची जागा आहे. लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाचा हा भाग असून, हवाई दलातील अधिकारी, कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना या भागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास तरुण टाटा गार्ड रुम परिसरातील भिंतीवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्या वेळी गस्त घालणाऱ्या हवाई दलातील कर्मचाऱ्यांनी तरुणाला पाहिले. तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

भितींवर चढून प्रवेश करण्याच्या प्रयत्नात तरुण पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याला हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. हवाई दलाच्या तळाच्या आवारातील अंतर्गत भागाची उत्सुकतेपोटी माहिती घेण्यासाठी भिंतीवर चढून प्रवेश करणार होता, असे तरुणाने हवाई दलातील अधिकाऱ्यांना सांगितले. भारतीय न्यायसंहिता कलम ३२९ (३) अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी हवाई दलाच्या जागेत बेकायदा प्रवेश करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×